लोकमत

"/>

'इंदिरा'ऐवजी चुकून 'अम्मा' बोलून फसले राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी बंगळुरुत इंदिरा कॅन्टीनचं उद्घाटन केलं आहे. इंदिरा कॅन्टीनमध्ये पाच रुपयांत नाश्ता आणि 10 रुपयांत जेवण दिलं जाणार आहे. उद्घाटन केल्यानंतर राहुल गांधी यांनी कॅन्टीनमध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. राहुल गांधी यांनी जयनगर वॉर्डमध्ये कॅन्टीनचं उद्दाटन करताना राज्यामधील काँग्रेस सरकारने अशा कॅन्टीनची कल्पना अंमलात आणली याचा गर्व असल्याचं सांगितलं. मात्र यावेळी बोलताना राहुल गांधींची चांगलीच पंचाईत झाली. कारण बोलताना राहुल गांधींनी इंदिरा कॅन्टीनचा 'अम्मा' असा उल्लेख केला. विशेष म्हणजे तामिळनाडूतील 'अम्मा कॅन्टीन' योजनेच्या धर्तीवर आजपासून कर्नाटकमध्ये 'इंदिरा कॅन्टीन' योजना सुरु करण्यात आली आहे. 

'सर्वांना अन्न' या काँग्रेसच्या संकल्पनेकडे काँग्रसने उचललेलं हे पाऊल असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. ते बोलले की, 'शहरातील कोणत्याही गरिबाला भुकेल्या पोटी राहावं लागू नये. बंगळुरुतील अनेक लोक मोठ्या घरात राहतात, महागड्या गाड्यांमध्ये फिरतात, त्यांच्यासाठी अन्न ही काही मोठी गोष्ट नाहीय मात्र येथे अनेक गरिब लोकही राहतात, ज्यांच्याकडे जास्त पैसे नसतात. इंदिरा कॅन्टीन अशा लोकांची सेवा करेल'.  

सविस्तर बातमी : लोकमत