Lokmat

"/>

लडाखमध्ये चिनी सैनिकांची रोखली घुसखोरी

डोकलामनंतर आता चिनी सैनिकांनी लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मंगळवारी ही घटना समोर आली आहे. भारतीय जवानांनी अटकाव केल्यानंतर चिनी सैनिकांनी दगडफेक केली, यालादेखील भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या घटनेत काही सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळाने चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले.  

भारताच्या स्वातंत्र्यदिनीच चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) सैनिकांनी सकाळी 6 आणि त्यानंतर 9 वाजता भारतीय सीमाभागातील ‘फिंगर फोर’ आणि ‘फिंगर फाइव्ह’ भागात घुसण्याचा प्रयत्न केला. यापैकी ‘फिंगर फोर’ भागात प्रवेश करण्यात त्यांना यश आले. मात्र भारतीय जवानांनी अटकाव करत तत्काळ त्यांना माघारी घालवले. सतर्क भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा प्रतिकार केला.  अटकावापुढे काही होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हतबल चिनी सैनिकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांनीसुद्धा या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, दिल्लीतील लष्कराच्या प्रवक्त्यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Source : Lokmat